कृषी कायदे;पिक विमा पॉलिसी विरोधात किसान ब्रिगेडचा माहूर तहसीलवर मोर्चा | Nanded | Sakal Media |

2021-04-28 98

केंद्र शासनाने आगामी काळात पारित केलेले तीन कृषी कायदे व पिक विमा धोरणाच्या विरोधात किसान ब्रिगेड शेतकरी संघटने तर्फे आज (ता.२२)रोजी माहूर तहसीलवर भव्य मोर्चा काढण्यात आला.मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाल्यानंतर किसान ब्रिगेड संघटनेच्या वक्त्यांनी दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.माहूर तहसीलच्या प्रवेशद्वारावर आयोजित करण्यात आलेल्या या जाहीर सभेत किसान ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष प्रकाश पोहरे,राष्ट्रीय प्रवक्ते पुरुषोत्तम गावंडे,प्रदेशाध्यक्ष अविनाश काकडे,जिल्हा परिषद सदस्य समाधान जाधव,प्रदेश समन्वयक प्रकाश बुटले,लोकशासन आंदोलन पार्टीचे प्रदेशाध्यक्ष निरज धुमाळ,संभाजी राव तेटर यांच्या यांच्या नेतृत्वात नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँके पासून तहसील कचेरीवर शेकडो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोर्चा धडकला.
व्हिडिओ: साजीद खान,(वाई बाजार जि.नांदेड)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Free Traffic Exchange

Videos similaires